
प्रतिनिधी..लहू लांडे
नवसह्याद्री चारिटेबल ट्रस्ट तर्फे चाकण येथे शैक्षणिक इमारत उभारली जात आहे. जिल्हाधिकारी पुणे डाॅ.सुहास दिवसे ,उपविभागीय अधिकारी खेड,आंबेगाव व जुन्नर मा.अनिल दौंडे,माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे,शामराव देशमुख,कृषी अधिकारी ज्ञानदेव दिघे,भगवान घोडेकर,श्री.मोहनशेठ अगरवाल,मातोश्री चॅरिटेबल ट्रस्ट,पुणे अध्यक्ष अमोल ससाणे, संस्था सचिव अर्पणा ससाणे,YCMOU पुणे जिल्हा विभागीय समन्वयक उत्तम जाधव,गवारी भाऊसाहेब,सर्व शाखांचे प्राचार्य,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्याच्या उपस्थितीत या भव्य शैक्षणिक इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले.भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे उपविभागिय अधिकारी अनिल दौंडे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष एन.डी.पिंगळे यांचे आभार मानले.गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाद्वारे देशाच्या प्रगतीस हातभार लागेल असे म्हणाले.याप्रसंगी शेखर घोगरे व शामराव देशमुख यांनी आपल्या मनोगताद्वारे संस्थेची शैक्षणिक वाटचाल मांडली.या कार्यक्रमाचे प्रास्तविक करत असताना संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अध्यापक महाविद्यालय चाकण,IBMR कॉलेज चाकण,IMS कॉलेज पिंपरी,केबीपी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चाकण,निर्मलाताई पिंगळे विधी महाविद्यालय चाकण,कै भागूबाई विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज चाकण,YCMOU विद्यपीठ नाशिक अंतर्गत चालवले जाणारे कोर्सेस, इनोव्हेटिव्ह स्कूल चाकण यांची थोडक्यात माहिती अर्चना मंगळुरकर यांनी दिलीभूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एन.डी.पिंगळे,सचिव शितल टिळेकर,संस्था संचालक संदेश टिळेकर, ज्ञानेश्वर दुधवडे,प्राचार्य जितेंद्र हुडे ,प्राचार्य कैलास दौंडकर ,प्राचार्य गोरोबा खुरपे,उपप्राचार्य संतोष बुट्टे ,प्राचार्य खरात,प्राचार्य अर्चना मंगळुरकर ,प्राचार्य अनिल ठोंबरे,कोयाळी गावचे आदर्श सरपंच सतीश भाडळे तसेच सर्व शाखांचे प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मंठळकर व निशिकांत मराठे यांनी केले आणि आभार डाॅ. कैलास दौंडकर यांनी मानले.