

राजगुरुनगर:- ता खेड दि. १/१२/२०२४ आज रोजी शहरातील प्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी माननीय श्री रुपेश शेठ जवळेकर सर्व जवळेकर परिवार बाजारपेठ मधील सोनार व्यवसायिक व सराफ त्यांचे सर्व मित्र मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खेड तालुक्यातील नवनिर्वाचित आमदार मोठ्या मताने निवडून आल्याबद्दल सर्वांनी एकत्र येऊन यांचा सत्कार केला जवळेकर कुटुंबावर मनापासून त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत खेड तालुक्यातील माजी उपसभापती राजुशेठ जवळेकर( पंचायत समिती खेड) हे जवळचे कुटुंबातील प्रमुख आहे आमदार श्री माननीय बाबाजी शेठ काळे वारकरी संप्रदाय वारसा लाभलेले खेड तालुक्याला नेतृत्व मिळाले आहे. बाजारपेठ मधील जवळेकर सराफ अँड ज्वेलर्स माननीय रुपेश शेठ जवळेकर यांनी ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा देऊन आमदार साहेबांचा सत्कार करण्यात आला. रुपेश शेठ जवळेकर, सौ वैष्णवी रुपेश जवळेकर कु. श्रीपाद जवळेकर , सौ सुमन दगडूशेठ जवळेकर व संतोष गाडेकर यांनी नियोजन केले . नवनिर्वाचित आमदारांचा आज सत्कार करण्यात आला खेड तालुक पत्रकार संघ सर्वांच्या उपस्थितीत आमदार बाबाजी शेठ काळे साहेब सत्काराचा राजगुरुनगर बाजारपेठ कार्यक्रम संपन्न झाला