

प्रतिनिधी . सत्यवान शिंदे
खेड तालुक्यातील होलेवाडी येथील कुमारी आर्या माणिक होले हिने 38व्या नॅशनल सब ज्युनिअर तायक्वांदो चॅम्पियनशिप हरियाणा येथे पार पडलेल्या 22 किलो वजनाच्या मुलींच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रला गोल्ड मेडल मिळून खेड तालुक्याच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला. सेमी फायनल चा सामना हरियाणा व फायनल चा सामना उत्तर प्रदेश च्या स्पर्धकाबरोबर झाला. त्यात त्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये तिने त्या बलाढ्य स्पर्धा कावर मात करून गोल्ड मेडला गवसनी घालून महाराष्ट्र राज्याचे नाव उंचाविले. तिला या स्पर्धेसाठी मार्गदर्शन राजू सर, प्रतीक मांजरे, सातकर सर, रुपेश होले यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशामागे तिचे आई वडील, आजी आजोबा इतर कुटुंबीयांचा यांचा सिंहाचा वाटा आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल होलेवाडी व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि होलेवाडीतील ग्रामस्थांकडून कौतुका चा वर्षा होत आहे. तिने यापूर्वी देखील अनेक स्पर्धेमध्ये विविध स्तरावर पारितोषिक मिळवले आहे.