
शिरोली
खेड तालुक्यातील शिरोली येथील आदर्श विद्यालयांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर यांच्या वतीने इयत्ता आठवी ते दहावीच्या जवळपास ११९ मुला मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. डॉ.विलास माने तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. अशोक मेंदाड ?(प्राथमिक आरोग्य केंद्र, राजगुरुनगर )डॉ. अनिल निघोट (वैद्यकीय अधिकारी) महेश हरीवल (आरोग्य सहाय्यक अधिकारी) आणि आशा वर्कर साक्षी शिंदे या अधिकारी वर्गाने गोळ्या वाटपासाठी परिश्रम घेतले. आदर्श विद्यालयाचे मधुकर दौंडकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदीसह पालक यावेळी उपस्थित होते.