
खरपुडी बु.
खेड तालुक्यातील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक ता. खेड .जि. पुणे येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय ,आंबे. ता. मावळ येथील कृषी कन्यांचे शुभ आगमन झाले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून त्या कृषी कन्या शेतकऱ्यांचे माती परीक्षण, नमुने बीज प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आधी संदर्भामध्ये माहिती देणार आहेत. याप्रसंगी आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक जयसिंग भोगाडे ,ग्रामसेविका दिपाली भोर, उपसरपंच प्रणील चौधरी मा. चेअरमन तानाजी बरबटे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप गायकवाड, ग्रामपंचायत आदर्श कर्मचारी नवनाथ बरबटे आणि गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्राजक्ता मोडक, प्रमुख समन्वयक डॉ. प्रशांत घाडगे, प्रा.अविनाश खरे प्रा. पांडुरंग जगताप ,प्रा. प्रीती नवलकर, प्रा. मिलिंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या समृद्धी वैरागर, दिपाली डामसे ,दिपाली डोळस, निकिता विक्कड ह्या पुढील तीन ते चार महिने गावातील शेतकऱ्यांचे शेती अनुभव घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्राजक्ता मोडक यांनी दिली.