दि. 6 डिसें 2024, रोजी बुद्धीस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगुरूनगर ( खेड ) येथे युगप्रवर्तक, बोधिसत्व, विश्वभूषण, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.*

Spread the love

प्रतिनिधी. रोहित पाटील
अभिवादन सभेसाठी प्रामुख्याने राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक व खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष विजुभाऊ डोळस यांनी अभिवादन करून आपले विचार मांडले.
त्यासोबतच भारतीय बौद्ध महासभा खेड तालुका xyz राजेंद्र भोसले, युवा नेतृत्व यश गायकवाड आणि RPI चे नेते अनिल जाधव यांनी आणि इतर पुरोगामी विचारांचे  लोक उपस्थितीत होते.
यावेळी मानवंदना देण्यासाठी बीबीसी कडून अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने
मा. श्याम वाकोडे, अध्यक्ष BBCA
मा. प्रशांत तुळवे, उपाध्यक्ष BBCA
मा. संतोष येवले, सचिव BBCA
मा. निलेश नितनवरे, कार्याध्यक्ष BBCA
मा. धम्मदिप गवारगुरु, प्रवक्ते BBCA
मा. अभय नगरे, सोशल मीडिया प्रमुख BBCA
मा. विष्णूदादा इंगोले, सहकार्याध्यक्ष BBCA
मा. नविद मगदुम, सोशल मीडिया प्रमुख – पुणे
मा. कैलास केदारी, सदस्य BBCA यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेबांचे विचार अंगीकारून तसंच समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही Buddhist Business Community Association वचनबद्ध आहोत असे बीबीसीचे अध्यक्ष प्रा. श्याम वाकोडे यांनी प्रतीपदित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents