

चौकार।
पुणे जि. परिषद पुणे ,पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ ,खेड तालुका पंचायत समिती,खेड तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ,खेड तालुका मुख्याध्यापक संघ व इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 17 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल चाकण या ठिकाणी पार पडले. या प्रदर्शनात आदर्श विद्यालय आंबोली तालुका खेड या शाळेने यशाचा चौकार मारला आहे. या प्रदर्शनात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विज्ञान प्रकल्प ,विज्ञान प्रश्नामंजुषा,विज्ञान वक्तृत्व,विज्ञान निबंध,विज्ञान नाट्य, विज्ञान रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण डाएट पुणे चे। संपर्क अधिकारी श्री.बाळकृष्ण वाटेकर साहेब,चाकण नगरपरिषद चे मुख्याधिकरि श्री.चंद्रकांत भोसले,गटशिक्षणाधिकारी श्री.अमोल जंगले साहेब,संस्थेचे अध्यक्ष श्री.एन.डी. पिंगळे साहेब यांचे शुभहस्ते पार पडले. सदर प्रदर्शनात विद्यालयातील कु.दिक्षा कुंडलिक सावंत या विध्यार्थिनीचा निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात तृतीय क्रमांक मिळाला.विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्राथमिक गटात कु.गौरीं विशाल कांबळे व कार्तिकी सचिन शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकवला. तसेच प्रश्नामंजुषा स्पर्धेत माध्यमिक गटात प्रवीण दिनेश लोहोट व ओंकार धोंढीभाऊ मेंढरे या विध्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला .तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात कुं. आर्या विजय खंडागळे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला.या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री.विलास आदलिंगे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेश शिंदे, सचिव बाळासाहेब शिंदे, सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पोटवडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी यांच्या वतीने अभिनंदम करण्यात आले.