
प्रतिनिधी. सत्यवान शिंदे
कार्तिकी सुनील मकवाने वय ९व दुर्वा सुनील मकवाने वय ८ अशी मयत मुलीची नावे आहेत नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहयला होत्या त्यालगतच बियरबारमध्ये काम करत असलेल्या सहा परप्रांतीय यांच्या खोलीत मृतदेह पोलिसांना मिळून आले असे बोलले जाते दोन्ही मुली दुपारी खेळताना गायब झाल्या होत्या घरच्यांनी खुप शोधल्या नंतर मुली न भेटल्यावर त्यांनी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली दोघी सख्ख्या बहिणी असुन बाहेर गावाहून मोलमजुरी करणारे कुटुंब आहे.पोलीस चौकशीतून मुली राहत असणारे चाळीत चौकशी केली त्यावेळी बार मध्ये काम करणारी जी मुले होती त्यांच्या खोलीची झडती घेतली त्यावेळी अवघ्या गुडघ्याभर पाणी असलेल्या बॅरल मध्ये दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळुन आल्याचे सांगण्यात आले दोन्ही मुलीचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले हरवलेल्या दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळुन आल्या आहेत असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले.
त्याच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच काही सांगता येणार नाही असे ते म्हणाले दरम्यान राजगुरुनगर येथील धनराज बियर बार मध्ये काम करणार्या वेटरने हे खुन केले असुन पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लाॅजवर त्याला अटक करण्यात आली आरोपी ५०/५५ वयाचा असल्यांचे पोलीसांनी सांगितले.गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी आजुन माहीती देण्यास नकार दिला.खुन कश्यासाठी केला काय झाले याचा तपास आजुन चालू आहे.