

प्रतिनिधी सत्यवान शिंदे
खेड तालुक्यातील पानमळा येथील ज्ञानमाता सौ जयश्री न्यानेश्वर गुरव स्मृती नवोत्सव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या शाळा डीजे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल इंग्रजी माध्यम राजमाता जिजाऊ कन्या शाळा माध्यमिक डीजे केंब्रिज स्कूल सेमी माध्यम फातिमा अभिषेक शिशु शाळा पानमळा यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन पर गीते, नाट्यछटा, मनोरंजन पर गीते आणि नृत्य केले. यावेळी शांताराम घुमटकर (अध्यक्ष महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान), जिजाराम शिंदे( राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते), अशोक सुतार (निवृत्त पुरवठा अधिकारी) विजयाताई शिंदे( संचालिका राजगुरुनगर सहकारी बँक) ॲड रंजनी नाईक, शिवशंकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर गुरव, सचिव ॲड अमृता गुरव श्रीमती प्रमिला गुरव, मुख्याध्यापिका अर्चना सुतार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या शाळा , रूपाली सुतार सुप्रिया सहाने, घुमटकर मॅडम; ज्योती थिटे मॅडम; गारगोटे मॅडम; सोनवणे मॅडम; मुख्याध्यापिका डीजे केंब्रिज सेमी माध्यम व इंग्रजी माध्यम स्कूल तसेच अनेक पालक सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेहसंमेलनामध्ये सांस्कृतिक सामाजिक आणि समाज प्रबोधन पर अनेक विविध उपक्रम राबवल्यामुळे पालकांनी आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.