


रक्तदान शिबिराचे उद्घाटन चाकणचे उद्योजक व माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोरे व खेड तालुका मा.संघचालक शिवाजी खराबी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी ५७ जणांनी रक्तदान केले.यासाठी रक्तसंकलन जनकल्याण रक्तपेढी पुणे यांचे वतीने कऱण्यात आले.
रक्तदान शिबीर सह्याद्री करिअर ॲकॅडमीमध्ये घेण्यात आले.
या प्रसंगी सेवा भारतीचे प्रांत कार्यकर्ते विनोद देशपांडे, उदय कुलकर्णी, सुधीर जवळेकर, खेड तालुका कार्यवाह शेखर करपे, सह्याद्री करिअर ॲकॅडमीचे रावसाहेब ढेरंगे, सेवा भारतीचे सचिव अरुण साळुंके, ऍड योगिता खराबी ,अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अतुल सवाखंडे, मनोहर शेवकरी, वसुंधरा संस्थेचे धनंजय शेवकरी, प्रमोद बचुटे, कलाविष्कार मंचचे नारायण करपे, सेवा भारतीचे संजय बोरकर , शिवस्वराज्य ग्रुपचे विक्रमसिंह शिंदे, चेतन लक्किबैलकर, भारतीय जनता पक्षाचे अमृतनाना शेवकरी, दत्ता परदेशी , फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड किरण झिंजुरके , राजीव दिक्षीत व दिव्यज्योती जागृती संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान शिबिरास शिवसेना पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव, संजय बोथरा, सेवा भारतीचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी भेटी दिल्या. जे .एस.इंजिनिअरिंगचे शिवजी उगाने यांनी चहा, नाष्ट्याची व्यवस्था केली होती.शिबीर यशस्वी करण्यासाठी सेवा भारतीचे अमोल कोथंबिरे, योगेश घुमरे, विकास मुळूक, राहुल देशमुख व सह्याद्री करिअर अकॅडमीच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. प्रास्तविक सेवा भारतीचे सचिव अरुण साळुंके यांनी केले व आभार सेवा भारतीच्या ऍड. योगिता खराबी यांनी मानले.