


खेड/चाकण
प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्या तील रेटवडी येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 21 व 22 जानेवारी 2025 रोजी श्रींच्या पादुकांचे अक्कलकोट पालखी प्रदक्षिणा, दिनांक 23 ते 26 जानेवारी 2025 श्री स्वामी समर्थ महाराज मठ रेठवडी स्वामींचे पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार आहे तसेच रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी सात ते नऊ वाजता पर्यंत श्रींची महापूजा आरती दुपारी चार ते साडेपाच वाजेपर्यंत संगीत भजन कार्यक्रम सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजेपर्यंत श्रींचा पालखी सोहळा सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत श्रींची महाआरती या सर्व धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी सात वाजता महाप्रसादेचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती दिलीप काका पवार अध्यक्ष स्वामी समर्थ सेवा मंडळ रेटवडी व सर्व संचालक मंडळ सर्व स्वामी भक्तगण यांनी दिली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि या धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे सद्गुरु विजय महाराज यांनी सांगितले आहे.