

खेड/रेटवडी
प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील रेटवडी येथील खेड पाटबंधारे विभागाचे अधिकारी कै. बाळासाहेब लक्ष्मण डूबे यांच्या स्मरणार्थ आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेटवडी ता.खेड या शाळेस खेड विश्व हिंदू परिषद राजगुरुनगर शहर प्रखंड मातृशक्ती संयोजक सुरेखाताई डूबे यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाच हजार रुपये देणगीचा धनादेश मुख्याध्यापिका सुखदा जगताप यांना कै.श्रीधरराव वाबळे पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास पवार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला . यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, रेटवडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच त्यांनी गावातील विविध संस्थांना देखील देणगी दिली आहे. त्यांच्या या समाज उपयोगी उपक्रमाचे दानशूर स्वभावाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.