


प्रतिनिधी लहू लांडे
खेड/रेटवडी
खेड तालुक्यातील आदर्श गाव रेटवडी या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी रेटवडी गावातील विविध वस्त्यावरील महिलांनी एकमेकींना सुवाशिनिंचा हळदीकुंकू लावण्याचा कार्यक्रम अगदी उत्साही वातावरणात संपन्न केला .यानिमित्ताने गुळाणी येथील लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर माऊली ढेरंगे यांनी हळदीकुंकवासाठी भेटवस्तू देऊन स्त्री सन्मान केला. सर्व महिलांनी त्यांचे कौतुक केले आहे.
या कार्यक्रमासाठी आदर्श सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे विजयसिंह शिंदे पाटील ,गुळाणी गावचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर(माऊली)ढेरंगे वाफगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कराळे आमदार बाबाजी काळे यांच्या कुटुंबियातील सर्व महिलांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पै आनंदराव काळे सूत्रसंचालन ॲड देशमुख आणि आभार प्रदर्शन ललिता काळे यांनी केले. हा हळदी कुंकू समारंभ पार पाडण्यासाठी सुरेखाताई डूबे खेड विश्व हिंदू परिषद राजगुरुनगर शहर प्रखंड मातृशक्ती संचालिका आणि सामाजिक कार्यकर्ते संजू पवार, गणेश काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी रेटवडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेटवडी येथे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर(माऊली)ढेरंगे यांनी हा जो महिलांचा मान सन्मान सोहळा केला त्याबद्दल येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीस त्यांना रेटवडी गावच्या वतीने सरपंच निर्मलाताई हिंगे व सर्व महिलांनी आगाऊ अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यात आल्या.