

खेड येथील खरपुडी बुद्रुक येथे , पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी कृषी जागरूकता आणि कृषी कार्यक्रमांतर्गत शेती विषयक वेगवेगळे उपयुक्त ॲप्सचा वापर केल्यास शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देता येऊल, तसेच आपले उत्पन्न कमी वेळात कमी खर्चात घेता येईल .शेती विषयीची माहिती देणारे ॲप , ज्या ॲप मध्ये वेगवेगळ्या बाजार मंडीची माहिती , धान्यांची किंमत ,शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल या ॲपवर विकता येतो ,खरेदी करता येतो , याबद्दल शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद कृषीकन्यांना मिळाला.शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन झाले. शेतकऱ्यांना बरेच ॲप्स बद्दल माहिती सांगीतली, कसे डाऊनलोड करायचे ते सांगीतले, दाखविले. कृषीकन्या निकिता बिक्कड, दिपाली डामसे, दिपाली डोळस , समृद्धी वैरागर यांना कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक निंबाळकर सर, डॉ. प्रशांत घाडगे आणि महाविद्यालयातील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .