

प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथे सर्व महिला भगिनींना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रक


कोहिनकरवाडी , सातकर स्थळ, होलेवाडी , मांजरेवाडी, झन -झन स्थळ रेटवडी ,खरपुडी निमगाव आणि पंचक्रोशीतून जवळपास २००० ते २५०० हजाराच्या आसपास महिला उपस्थित होत्या.यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक गावातील महिला सरपंच सदस्य व पोलीस पाटील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या. यावेळी सहजयोग परिवारातर्फे हळदी कुंकवाचे महत्त्व महिलांना अगदी सरळ आणि साध्या भाषेमध्ये दिपाली थिगळे व त्यांच्या सर्व टीमने समजावून सांगितले. आपली संस्कृती काय आहे .हळदीकुंकू कशासाठी साजरे करायचे या संदर्भातील तोला मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे सर्व महिलांमध्ये समाधान दिसून येत आहे .या कार्यक्रमाचे समारंभाचे नियोजन अगदी छान केल्यामुळे सौ अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी अनेक महिलांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. शेवटी स्नेहभोजनाने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. आलेल्या सर्व महिलांचे आभार कार्यक्रमा अश्विनीताई पाचारणे व प्रियंकाताई पाचारणे यांनी केले.