
लहुजी.लांडे
चाकण (ता. खेड) जवळील पठारवाडीच्या शाळेत चाकण फांऊडेशनच्या सहकार्याने चार दिवसीय Art of living कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना सुदर्शन क्रिया, प्राणायम, भस्त्रिका, ओंकार जप तसेच विविध आनंददायी खेळ आणि स्वच्छतेचे धडे देण्यात आले. अशी माहीती मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी दिली संस्थेच्या वतीने राजश्री राणे दिदी, मिनाक्षी फापाळे मॅडम, ज्ञानेश्वर बहिरट सर, तसेच बाबूराव डोरले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पठारवाडी शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे अतिशय गरीब परिस्थितीतील असल्याने त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पडावा, संस्कारक्षम जीवनातून त्यांना चांगल्या सवयी जडाव्यात, त्यांचे आरोग्य तंदुरुस्त रहावे, या हेतून कार्यशाळेचे आयोजन केले होते शाळेतील एकूण ३३ विद्यार्थ्यांची नोंदणी चाकण फांउडेशनने केली होती. चाकण फाउंडेशन ही निस्वार्थ भावनेने सेवाभावी कार्य करणारी संस्था असून यापूर्वीही त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांकरीता दप्तरे, शुज, वह्या व लेखन साहीत्य दिले आहे. चाकण फांउडेशनचे संस्थापक सदस्य शिवाजी होळकर, संपत कदम, विक्रम रसाळ, योगेश भांड, ज्ञानेश्वर पवार, निवृत्ती अहिरे, दिलीप बोरसे, विलास वाडेकर, अविनाश कर्डिले, चंद्रकांत संकपाळ, दत्तात्रय वायबसे, भरत चांदगुडे, लक्ष्मीकांत वहाडणे, सचिन हजारे, अजय पारवे, संजय पाटील, दिलीप अहिरे, देवेंद्र चोरडिया यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. त्यामुळे सर्वच स्तरातून चाकण फाउंडेशनचे कौतुक होत आहे. समारोप प्रसंगी राजश्री राणे व ज्ञानेश्वर बहिरट यांनी पालक व विद्यार्थी यांना उद्बोधित केले. यावेळी विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने बोलू लागले. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, धाडस, सहकार्य, संभाषण कौशल्य हे गुण विकसित झाले आहेत. पालकांनीही या चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे सर्पमित्र अतुल सवाखंडे उपस्थित होते. प्रियांका बहिरट, सोनाली शिंदे, सुवर्णा पठारे, किर्ती पठारे, अपर्णा पठारे, गीता भोईर, उषा वाघमारे, नगीना चव्हाण, मंगल पठारे हे पालक तसेच अश्विनी लांडगे, नलिनी कदम, राणी संकपाळ, उषा झोपे, सोनाली चांदगुडे या महिला भगिनी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना अल्पोपहार व बिस्कीटे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली सदस्य शिवाजी होळकर यांनी सूत्रसंचलन केले. मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.