
प्रतिनिधी लहू लांडे
जि प प्राथ.शाळा रेटवडी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम पार पडला. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनिता संजय पवार या 39 वर्षे सेवेतून निवृत्त होत असताना विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक व शिक्षक वृंद आणि निरोप दिला. कार्यक्रमात सुनिता पवार यांनी आपला शैक्षणिक जीवनपट सांगितला वयाने ज्येष्ठ व अनुभवाने दीर्घ शिदोरी आपल्या सवंगड्यांना पुढील सेवेसाठी ऊर्जा देणारी होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खरपुडी बीटचे विस्ताराधिकारी दत्तात्रय गोसावी यांनी स्वीकारले. कार्यक्रम प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक काळे, उपाध्यक्षा अश्विनीताई डुबे,दत्तात्रय पवार, मारुती पवळे,संजय पवळे आदी उपस्थित होते. शालेय मुख्याध्यापिका सुखदा जगताप यांनी सविस्तर कार्यक्रमाचे नियोजन केले. केंद्रीय शिक्षण परिषदेमध्ये रोहिदास राक्षे,लता आदक,निलम खेडकर यांनी सुलभक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमास पुणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले,केंद्राचे केंद्रप्रमुख विजय सुरकुले यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची व्यवस्था ज्योती सांडभोर ,स्मिता पवार, संजय पवार,रोहिदास मांजरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार शेटे व मुगुटराव मोरे यांनी आभार मानले.