

सोहळ्यानिमित्त सकाळी आठ वाजता गणरायाचा अभिषेक झाला त्यानंतर ४ते५वाजता सत्यनारायणाची पुजा संपन्न झाली त्यानंतर हरिपाठ ५ते६ वाजेपर्यंत चालला६ते७ वाजेपर्यंत महीलांचा हळदी कुंकू कार्यक्रम झाला व संध्याकाळी ७ते९ *ह.भ.प चैतन्य महाराज राऊत* यांची किर्तन रुपी सेवा झाली तसेच नवनिर्वाचित *आमदार बाबाजीशेठ काळे* यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पाडला. त्यानंतर स्नेह भोजनाचा लाभ असंख्य भाविक भक्तांनी घेतला.या कार्यक्रमासाठी असंख्य राजकीय व्यक्तीनी हजेरी लावली त्यात राजगुरुनगर सहकारी बँकचे मा.अध्यक्ष गणेश थिगळे संचालिका अश्विनी पाचारणे मनसे उपाध्यक्ष मंगेश सावंत पतसंस्थेचे संचालक मनोज सावंत उद्योजक दत्ताभाऊ कंद वकील विजयकुमार भगत ज्योतीताई आरगडे तसेच गावच्या विविध संघटनेचे संस्थेचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ हजर होते असंख्य भाविकांनी हजेरी लावली तसेच सर्व कार्यक्रम अंबिका तरुण मंडळाच्या सहकार्याने उत्साहात पार पडला.