खेड प्रतिनिधी लहुजी लांडे बातमी पाठवण्यासाठी आमचा व्हाट्सअप क्रमांक 9766694886खेड पोलिस ठाण्यात विश्व हिंदू परिषद राजगुरू शहर प्रखंडाच्या वतीने महिला पोलीस अधिकाऱ्यांना हळदीकुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या समयी सर्व पोलीस अधिकारी महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.भीमाशंकर जिल्हा संयोजिका वैशालीताई लांडगे, राजगुरुनगर शहर प्रखंड संयोजिका सुरेखाताई डुबे , सहसंयोजक शालिनीताई गिलबिले यांनी सर्व पोलीस अधिकारी महिला वर्गाला हळदी कुंकू लावून आणि तिळगुळ देऊन सन्मानित केले. सर्व महिला पोलिस अधिकारी वर्गामध्ये या कार्यक्रमामुळे उत्साही व आनंदी वातावरण दिसून आले