प्रतिनिधी लहू लांडे बातमी पाहण्यासाठी आमचा नंबर व्हाट्सअप चा सेव करा 9766694886खेड तालुक्यातील श्री क्षेत्र गुळाणी येथील खळदकर वस्तीवर जोपासली गेली पूर्वीच्या काळचे मडक्यामध्ये बटाटे भाजण्याची परंपरा. प्रगतशील शेतकरी सत्यनारायण खळदकर यांनी आपल्या शेतामध्ये बटाट्याचे उत्पादन घेतलं होतंत्यांनी आदर्श संगणक तज्ञ संदीप पिंगळे पा,आदर्श उद्योजक सुरेश होले, तुषार कातोरे, सैन्य दलातील अधिकारी किसनराव सांडभोर, पत्रकार दत्ता भगत हे उपस्थित होते. मटक्यातील बटाटे भाजून खाण्याचा आनंद वेगळाच असतो आणि तो खळतकर कुटुंबियांनी आम्हाला दिला त्याबद्दल सर्व मान्यवरांनी खळदकर कुटुंबीयांचे कौतुक केले आहे. जुन्या काळातील परंपरा अजूनही खळदकर कुटुंब जोपासत आहे . हे सर्व बटाट्याच्या मडक्यात भाजण्याची प्रक्रिया करण्यासाठी मारुती खळदकर, एकनाथ खळदकर, ऋषिकेश खळदकर यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रगतशील शेतकरी सत्यवान खळदकर आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचे पत्रकार दत्ता भगत यांनी अभिनंदन केले आणि आभार मानले.