

प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि विद्यमान सरपंच जयसिंग भोगाडे यांच्या भगिनी सरस्वती ताई बबन काशीद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच प्रणिल चौधरी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली. उपसरपंच पदी निवडणूक घेण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून रविंद्र पाटील साहेब यांनी कामकाज पाहिले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी सरस्वतीताई बबन काशीद यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध उपसरपंच पदी घोषणा करून त्यांची नेमणूक केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगलताई गायकवाड (मा. सभापती) , प्रणिल चौधरी, गुलाबाई चौधरी,गुलाब चौधरी. किरणशेठ शिंदे, अश्विनीताई बरबटे,ज्योतीताई काशीद ,विशाल काशीद तसेच चेअरमन सतीश तनपुरे ,पोलीस पाटील दादाभाऊ निकाळजे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप गायकवाड, मा. चेअरमन साहेबराव भोगाडे, संजय गायकवाड, तानाजी बरबटे, गुलाब चौधरी .हभप दत्तात्रेय बरबटे, हभप रामदास गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश काशीद, निलेश सुपेकर , अध्यक्ष नामदेव भोगाडे, अनिल शिंदे, श्रीधर चौधरी मा. सैनिक, गणेश काशीद, माणिकशेठ भोगाडे,माऊली भोगाडे, संजय काशीद विश्वनाथ शिंदे ,विलास काशीद, संजय काशीद ,योगेश चौधरी, प्रदीप चौधरी,आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ बरबटे आणि खरपुडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरस्वतीताई काशीद यांची उपसरपंच पदी निवड झाल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे. बहिण भाऊ सरपंच व उपसरपंच असणारी एकमेव खरपुडी बुद्रुक हि पहिलीच ग्रामपंचायत असावी अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.