


प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथील कै.वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालयांमध्ये मार्च २०२४/२०२५ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील शाळेविषयी चे प्रेम आणि वेगवेगळे अनुभव या ठिकाणी व्यक्त केले आहे. प्रेरणा मार्गदर्शक प्रा. कैलास चौधरी पाटील (संस्थापक चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल खरपुडी बुद्रुकचे) संस्थापक अध्यक्ष यांच्या व्याख्यान रुपी मार्गदर्शनाने संपन्न झाला. दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर कसे लिहावे. अभ्यासामध्ये मन कसे रमावे. जीवनामध्ये काय करावे. आदर्श जीवन कसे जगावे. जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आरोग्य, पर्यावरण याही बाबींकडे लक्ष द्यावे असा तोलामोलाचा संदेश त्यांनी दिला. भविष्यामध्ये कशाप्रकारे पुढील शिक्षणासाठी मार्ग निवडावे . अनेक वेगवेगळे दाखले, उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. त्यांनी विद्यालयासाठी करियर मार्गदर्शनपर स्वलिखित पुस्तके भेट दिली. मांजरेवाडीच्या लोकनियुक्त आदर्श सरपंच अनिताताई मांजरे यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांनी पेपर चांगले लिहावे. चांगले गुण मिळवून आपलं करिअर बनवावे . शाळेचे आई-वडिलांचे नावलौकिक करावे. मार्च २०२५ च्या येणाऱ्या परीक्षेसाठी चांगले पेपर लिहिण्यासाठी सदिच्छा शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक विष्णुपंत मेदगे यांनी धुरा सांभाळली . आपल्या मनोगतांमध्ये विद्यार्थ्यांचे वेगवेगळे शैक्षणिक तसेच वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी मिळवलेले यश या सर्व बाबींचा आढावा त्यांनी मांडला आणि येणाऱ्या परीक्षेसाठी त्यांनी सदिच्छा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन दहावीच्या वर्गशिक्षिका संध्या मांजरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आदर्श शिक्षक पांडुरंग पवळे यांनी केले. व शेवटी अल्प उपहार देऊन निरोप समारंभाचा समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.