


प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्याचे विद्यमान तहसीलदार यांनी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती असलेली कुंडी आपल्या कार्यालय समोर ठेऊन गौतम बुद्धांचा अपमान केला आहे. समाजात अनेक समाजाला कलंक असलेले व्यक्ती हे. संतांचे, देवाचे, महाराजांचे, आमच्या तथागत बुद्धांचे अपमानास्पद कृत्य करून थोर व्यक्तींवर शिंतोडे उडवत आहे. आणि आता मात्र तालुका नियमबद्ध चालवयाचे काम ज्याचे आहे असेच व्यक्ती तथागत गौतम बुद्धांचा अपमान करत आहे. याचा आंम्ही जाहीर निषेद करतो. ज्या थोर लोकांमुळे आपले खेड पवित्र झाले. याच ठिकाणी असे कृत्य होत आहे. तहसीलदारांनी जे कृत्य केले आहे. यामुळे सर्व समाज संतापला असून तहसीलदार यांना पदावरून बरखास्त करण्यात यावे व संपूर्ण समाजापुढे माफीनामा द्यावा व याचेवर गुन्हे दाखल करावे. खेड तालुक्याला साधुसंतांचा क्रांतिकारांचा वारसा असलेल्या तालुक्यांमध्ये तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे न्यायदंडाधिकारी म्हणून पाहिले जात अशा व्यक्तींकडूनच तथागत गौतम बुद्धांचा अपमान होत असताना तालुक्यातील जनतेने काय आदर्श घ्यायचा. जर तहसीलदार यांनीआमच्या मागण्या पुढील ५ दिवसात पूर्ण केल्या नाही तर भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु।। मा. श्री. आकाशभाऊ शांताराम डोळस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण खेड तालुक्यात १४ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येईल.