
प्रतिनिधी लहू लांडे
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणारे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिष्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथभाई शिंदे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी ठाकूर पिंपरी तालुका खेड येथील निर्मल बाल विकास अनाथ आश्रम संस्था येथे शिवसेना जिल्हाध्यक्ष व खेड पंचायत समिती माजी सभापती भगवान पोखरकर ,पंचायत समिती सदस्य ज्योतीताई अरगडे व कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाने जीवनावश्यक वस्तू कडधान्य व फळ वाटप केले. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेने उंचीवर नेत असताना श्री एकनाथ भाई शिंदे यांना उदंड आयुष्य लाभो अशी सर्व चिमुकल्यांनी प्रार्थना केली. या उपक्रमास हिंदुत्ववादी कार्यकर्ते योगेशजी पवार , विशाल (आबा) टाकळकर , उद्योजक अमित घुमटकर, वैभव वाळुंज ,किरण वाळुंज ,प्रथमेश सांडभोर, अविनाश वाघोले ,निलेश वाळुंज ,अच्युत वाळुंज संकेत लांडे निखिल वाळुंज मयूर ठाकूर ,मयूर वाळुंज , मोहनदाजी गावडे व शिवसैनिक उपस्थित होते.