


प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सरकुंडी येथील डॉ. देवेंद्र ओव्हाळ हे रहिवासी असून येथील पश्चिम भागातील 63 गावांमध्ये मुक्या जनावरांवरती पशुवैद्यकीय सेवा रात्रंदिवस काम करत असून यांनी आपल्या कामासोबत पत्रकारिता जोपासले आहे दुर्गम आदिवासी भागातील असणाऱ्या लोकांच्या समस्या व अडीअडचणी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे ते जनसंवाद न्यूज चैनल चे संपादक म्हणून काम पाहत आहे तर उपसंपादक म्हणून सुनील जी वाकचौरे हे करत आहे तसेच दैनिक युवक आधारचे ते पत्रकार आहेत दक्ष वेद न्यूज, अस्सल न्यूज महाराष्ट्र, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, या सर्व यूट्यूब चैनल ला पत्रकार म्हणून काम करत आहे डॉक्टरांची एकंदरीत 24 वर्षांची पशुवैद्यकीय सेवा पाहता व पत्रकारिता पाहता त्यांना अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ भारत सरकार मान्यता प्राप्त जे लोक वार्ता पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर व पत्रकार बंधू उपस्थित होते