

खेड/शिरोली
प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील शिरोली गावातील श्री गोविंद मनाजी राक्षे यांना जीवनगौरव पुरस्कार तर सौ शर्मिला रवींद्र सावंत पा. यांना आदर्श प्रिन्सिपल अखिल जनलोक पत्रकार संघाचे जनलोक वार्ता तर्फे राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या आदर्श कार्यायाचा आढावा आणि लेखाजोखा, सर्व बाबींचा विचार करून त्यांना महात्मा फुले सभागृह वानवडी पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना या मिळालेल्या पुरस्कारामुळे शिरोली गावातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंचक्रोशीतून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी शिरोली गावातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते