

अस्सल न्यूज महाराष्ट्र 24
प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरेवाडी पिंपळ येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील
मुलांनी विविध पोशाख आणि पेहराव केले होते. जसे कि छत्रपती शिवाजी महाराज, मावळे ,जिजाऊ, सईबाई, सोयरा, पुतळा बाई इ. मूलांनी जय शिवाजी जय भवानी, शिवाजी महाराज कि जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली . मुख्याध्यापिका सौ .निलिमा विष्णू मेदगे (सांडभोर) यांनी मूलांना शिवरायां विषयी माहिती सांगितली.नामदेव मुंढे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी मांजरेवाडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केलेले विविध हुबेहूब पोशाखांचे पेहराव आणि मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे ग्रामस्थांकडून आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्याकडून कौतुक होत आहे