


प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम यांच्या हस्ते कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली… यावेळी कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो… प्राथमिक विभागाच्या इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या घोषवाक्य पट्ट्या मराठी ब्रीदवाक्य यांचे वाचन केले… त्यानंतर कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांनी भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली… इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कुमारी मिताली येडे गौरव मराठी भाषेचा या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले तसेच मराठी भाषेवर आधारित मराठीची अस्मिता जपणारे एक पथनाट्य सादर करण्यात आले पथनाट्य मध्ये बोलीभाषेविषयी मराठी माझा स्वाभिमान.. मराठी माझा अभिमान… जागर मराठी भाषेचा… आपल्या मायबोलीचा.. त्यानंतर चाकण नगरीमध्ये मराठी भाषेचा गौरव प्रभात फेरीच्या माध्यमातून काढण्यात आला विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या घोषणा देण्यात आल्या.. सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ कानवडे मॅडम व सौ कोरगावकर मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते*