

दिनांक २३/०२/२०२५ रोजी चाकण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे बहुळ, ता. खेड, जि. पुणे येथील फुलसुदर वस्ती येथे वाडेकर यांचे राहते घरावर अनोळखी सहा दरोडेखोरानी सशस्त्र धाडसी दरोडा टाकला होता. सदरबाबत चाकण पोलीस ठाणे, गुरनं. ११४/२०२५ बीएनएस ३१० (२), ३११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात चाकण पोलीस ठाणेकडील तपास पथकाने आरोपी निष्पन्न केले होते. त्यातील रेकॉर्ड वरील आरोपी परश्या गौतम काळे यास सपोनि / प्रसन्न जन्हाड यांचे पथकाने श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले चौकशीअंती २. सचिन चंदर भोसले, ३. भिमेश ऊर्फ भिमा आदेश काळे, ४. मिथुन चंदर भोसले. ५. डांग्या चंदर भोसले, ६. अक्षय ऊर्फ किशोर हस्तलाल काळे यांचेसह दरोड्याची कबुली दिल्याने आरोपीताची नावे निष्पन्न केली होती. तसेच अटक आरोपी परश्या गौतम काळे याने त्याचे वरील नमुद साथीदारासह तसेच राजेश अशोक काळे याचेसह गेल्या चार महिन्यापुर्वी शेलपिंपळगाव येथील रहिवाशी अनिकेत दौंडकर यांचे घरावर सशस्त्र धाडसी दरोडा टाकला असल्याची कबुली दिली. त्याबाबत चाकण पोलीस ठाणे, गुरनं. ७१९/२०२४ बीएनएस ३१० (२), ३११ प्रमाणे गुन्हा नोंद होता. त्यातील आरोपी हे पोलीस रेकॉर्ड वरील असून त्यांचा कसोशीने शोध वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली चाकण तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करत होते.
दिनाक ०२/०३/२०२५ रोजी चाकण पोलीस ठाणेचे तपास पथकाचे सपोनि / प्रसन्न जन्हाड यांना वरील दोन्ही गुन्हयातील निष्पन्न दोन आरोपी सचिन चंदर भोसले व मिथुन चंदर भोसले असे मौजे चिचोशी, ता. खेड, जि. पुणे गावाचे हद्दीतील चिचोशी ते केंदुर रोड दरम्यान असलेल्या घाटामधील मंदिराचे ठिकाणी आले असल्याची खात्रीशीर गोपनिय बातमी मिळाली. तात्काळ सदरबाबत माहिती श्री. डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०३ व मा. प्रमोद वाघ साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे यांना फोनव्दारे संपर्क करुन दिली, वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे आरोपीतांना अटक करण्यासाठी डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०३, सपोनि / प्रसन्न जन्हाड व तपास पथकातील अंमलदार पोहवा /१०१६ हनुमंत कांबळे, पोशि/२८७९ सुनिल भागवत, पोशि/१९११ रेवन्नाथ खेडकर, पोशि/२६३४ किरण घोडके, पोशि/२८६९ महादेव बिक्कड व पोशि/३५४७ महेश कोळी खाजगी वाहनाने रवाना झाले.
दि.०२/०३/२०२५ रोजी मध्यरात्री २३:४५ ते दि.०३/०३/२०२५ रोजी ००:४५ वा. डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त, हे सदर ठिकाणी टिम सह पोहचले. त्यावेळी त्यांचेपैकी मिथुन भोसले हा रस्त्याचे दिशेने पळाला व सचिन भोसले याने त्याचे पॅन्टमध्ये खोसलेला लोखंडी कोयता बाहेर काढुन आमचे दिशेने वार करत धावुन आला त्याने कोयत्याने डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त व सपोनि / प्रसन्न जन्हाड यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला केला. हल्ला चुकविण्यासाठी मागे सरकले असता, सचिन भोसलेने केलेल्या कोयत्याचा वार छातीवर लागुन डॉ. शिवाजी पवार हे जखमी झाले. त्यानंतर त्याने लागलीच सपोनि / प्रसन्न जन्हाड यांचे डोक्यावर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला केला. हल्ला चुकविण्यासाठी मागे सरकले असता तो डावे बाजुचे दंडावर लागुन सपोनि/प्रसन्न जन्हाड हे जखमी झाले. लागलीच स्वसंरक्षणार्थ व त्यास अटक करण्याकरीता डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त यांनी त्यांचे सर्विस पिस्टल मधुन सचिन भोसले याचे पायाचे दिशेने दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी सचिन भोसले याचे उजव्या पायावर लागून तो खाली कोसळल्याने तपास पथकाने तात्काळ ताब्यात घेवुन निशस्त्र करुन जखमी दरोडेखोरास त्याच्या गुडघ्याच्या वरील भागात अतिरिक्त रक्तस्त्राव होवु नये म्हणून कापडी फडके बांधुन तात्काळ त्याचे जिवीतास धोका होवु नये म्हणून उपययोजना करत पुढील उपचारा करीता खाजगी वाहनाने युनिकेअर हॉस्पीटल चाकण औषधोपचाराकरीता दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिन्यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारा करीता ससुन सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे रेफर केल्याने त्याचे निगराणी करीता योग्य ते पोलीस गार्ड लावलेले असून सध्या दरोडेखोर नामे सचिन चंदर भोसले याची प्रकृती स्थिर असुन सुधारत आहे दरोडेखोरा विरोधात सपोनि / प्रसन्न जन्हाड यांनी दिलेल्या तक्रारी वरुन चाकण पोलीस ठाणे, गुरनं १२२/२०२५ बी.एन.एस २०२३ चे कलम १०९, १३२, १२१ (१) २६२. आर्म अॅक्ट ४ (२५), मपोका ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे हे करत आहेत.
• आरोपी परश्या गौतम काळे याचेवर यापुर्वीचे दाखल गुन्हेः-
अ.क्र.
पोलीस ठाणे
गुरनं.
०१
महाड एमआयडीसी पो. ठाणे
०९/२०१२
०२
श
राहुरी पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
२५४/२०१२
०३
श्रीगोंदा पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
३६/२०१३
०४
श्रीगोंदा पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
६७१/२०१७
04
श्रीगोंदा पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
७०८/२०१७
श
०६
श्रीगोंदा पो.ठाणे, जि. अहिल्यानगर
श
६१९/२०२०
श
श्रीगोंदा पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
७१७/२०२२
श
०८
चाकण पो. ठाणे, पिंपरी चिंचवड आ.
७१९/२०२४
०
चाकण पो. ठाणे, पिंपरी चिंचवड आ.
११४/२०२५
• आरोपी सचिन चंदर भोसले याचेवर यापुर्वीचे दाखल गुन्हेः-
अ.क्र.
पोलीस ठाणे
गुरनं.
०१
श्रीगोंदा पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
३४५/२०२२
०२
बेलवंडी पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
६८०/२०२४
०३
जेजुरी पो. ठाणे, जि. पुणे ग्रामीण
४२४/२०२३
०४
बेलवंडी पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
४०९/२०२३
04
बेलवंडी पो.ठाणे, जि. अहिल्यानगर
२२०/२०२४
०६
बेलवंडी पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
३००/२०२३
०७
बेलवंडी पो. ठाणे, जि. अहिल्यानगर
९८/२०१८
०८
चाकण पो.ठाणे, पिंपरी चिंचवड आ.
७१९/२०२४
०९
चाकण पो. ठाणे, पिंपरी चिंचवड आ.
११४/२०२५
कलम
भादवी कलम ३९६. ३९७ प्रमाणे. (खुनासह दरोडा)
भादवी कलम ३९७, ५११ प्रमाणे. (दरोडा)
भादवी ३९४, ३०२, प्रमाणे. (खुनासह जबरी चोरी)
भादवी कलम ३९५, ५०४, ५०६ प्रमाणे. (दरोडा)
भादवी कलम ३९९, ४०२ प्रमाणे. (दरोडा प्रयत्न)
आर्म अॅक्ट ४ (२५) प्रमाणे.
भादवी कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे.
बीएनएस कलम ३१० (२), ३११ प्रमाणे. (दरोडा)
बीएनएस कलम ३१० (२), ३११ प्रमाणे. (दरोडा)
कलम
भादवी कलम ४५७, ३८० प्रमाणे. (घरफोडी)
भादवी कलम ३२६, ३२४ (गंभीर दुखापत)
भादवी कलम ३९७, ३९४ प्रमाणे. (दरोडा)
भादवी कलम ३९९, ४०२ प्रमाणे. (दरोडा प्रयत्न)
भादवी कलम ४५७, ३८० प्रमाणे. (घरफोडी)
भादवी कलम ४३९ प्रमाणे. (चोरी)
भादवी कलम ३९९ प्रमाणे, (दरोडा प्रयत्न)
बीएनएस कलम ३१० (२), ३११ प्रमाणे. (दरोडा)
बीएनएस कलम ३१० (२), ३११ प्रमाणे.
(दरोडा)
मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त श्री. शशिकात महावरकर, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. शिवाजी पवार, परिमंडळ-३, श्री. विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त मुख्यालय, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी / सपोनि प्रसंन्त्र ज-हाड, सपोनि / गणपत धायगुडे, पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, राजु जाधव. सुनिल भागवत, रेवन्नाथ खेडकर, किरण घोडके, महादेव बिक्कड, महेश कोळी, शिवाजी चव्हाण, सुनिल शिंदे, भौरोबा यादव, उध्दव गर्जे, ऋषीकेश झनकर, सुदर्शन बर्डे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.
(डॉ. शिवाजी पवार) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड