


प्रतिनिधी दत्ता भगत
राजगुरुनगर नगरपरिषदेने जी काही चुकीच्या पद्धतीने करवाढ केलेली आहे. करवाडी च्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब ,त्याचप्रमाणे नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांना प्रत्यक्ष भेटून जी काय चुकीच्या पद्धतीने करवाढ केलेली आहे. ती कशा पद्धतीने चुकीची व अन्यायकारक आहे. हे त्यांना समजावून सांगितलेले आहे . त्यांना तसे निवेदन दिलेले आहे .परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचे उत्तर आम्हाला समाधानकार प्राप्त झालेली नाही किंवा कारवाई झालेली नाही. याबद्दल आज मी राजगुरुनगर परिषदेला तसेच खेड पोलिस स्टेशनचे पीएसआय ,प्रांत ऑफिस, तहसीलदारऑफीस यांना निवेदन देऊन. सोमवार दिनांक 10मार्च पासून राजगुरुनगर परिषदेसमोर उपोषणाला बसणार आहे. तरी माझी गावकऱ्यांना एक विनंती आहे .की हा माझा जो काही लढा चालू आहे हा तुमच्यासाठी चालू आहे . या लढ्याला कुठेतरी पाठिंबा भेटावा म्हणून गावकऱ्यांनी या लढाईमध्ये सहभाग घेऊन मला पाठिंबा द्यावा. या लढ्यामध्ये आपल्याला यश कसे मिळेल याच्या संदर्भात आपण सर्वांनी सहभागी होऊन एकजुटींचे गाव एकत्रआले आहे हे दाखवूया आणि करवाढ जी काही चुकीच्या पद्धतीने केली आहे .तिला स्थगिती कशी मिळेल यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. ॲड दिपक थिगळे यांनी असे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले.