


खेड/शिरोली
प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील शिरोली येथील आदर्श उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोहन सावंत यांनी आदर्श विद्यालयास दोन संगणक भेट देवून सामाजिक बांधिलकी जोपासले आहे. विशेष म्हणजे खेड तालुक्यातील प्रसिद्ध गाडामालक मोहन सावंत पाटील यांचे ते सुपुत्र आहेत .यावेळी शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक मा. चेअरमन तुकाराम सावंत ह .भ. प. भागचंद वाडेकर सर ,आदर्श उद्योजक महादू शेठ सावंत, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष महेंद्रशेठ शिनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व संचालक , ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर दौंडकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सुभाष सावंत यांनी आपल्या मनोगतांमध्ये विद्यालयास आणखी पाच संगणक देण्याचे कबूल केले आहे. आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर दजगुडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी महेंद्र बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संगणक मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान आणि उत्साही वातावरण दिसून आले.