
अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघ महाराष्ट्र राज्य महिला मंडळाच्या वतीने दिनांक 9 मार्च रविवार 2025 रोजी अग्रसेन भवन रेल्वे स्टेशन जवळ शेगाव येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून शिंपी समाजातील समस्त पोट जातीतील 500 महिला उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट भजनी मंडळ महिला मंडळ बचतगट, सामाजिक , राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा कला, व उद्योजक या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींना माता गोणाई नारी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत नामदेव महाराजांच्या 16 व्या वंशज सुनबाई आईसाहेब किशोरी नामदास या उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून एक संघाचे संस्थापक अध्यक्ष महेश ढवळे स्वागत अध्यक्षा सौ अरूणा शोभणे अनूपिया वाकरे,अपर्णा कुटे, सुषमा सावळे, अंजली बाविस्कर,सारिका केतकर, अंजली महाणकर, शशिकला उरणकर,हे प्रमुख उपस्थित राहणार असून कार्यक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अग्रसेन भवन रेल्वे स्टेशन जवळ शेगाव येथे संपन्न होणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश महिला एक संघाचे अध्यक्ष रेखाताई मुळतकर ,प्रज्ञा तल्हार अँड संध्या बागुल ,बबीता माळवतकर ,कुसुमताई बिरारी, यांनी केले आहे