पुणे खेड प्रतिनिधी.लहू लांडे बातमी सर्वसामान्यांचे आमचा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा 9766694886 खेड तालुक्यातील शिरोली येथील मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारी कुमारी जयेश्वरी भागचंद वाडेकर हिने 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.शिरोली येथील हभप भागचंद वाडेकर महाराज यांची ती कन्या आहे. या यशामागे माझे अथांग परिश्रम ,आई वडील गुरुजन वर्ग आणि क्रीडा शिक्षकांनी केलेली मार्गदर्शन हे माझ्या यशा मागचे गमक आहे असे स्पष्ट मत तिने व्यक्त केले. तिने मिळवलेल्या या सुवर्णपदकाबद्दल खेड तालुक्यातूनच नव्हे तर पंचक्रोशीतून आणि शिरोली गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले आहे. तिने विविध स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर यश संपादन केल्यामुळे तिच्या पुढील कारकीर्दीसाठी सर्वांनी तिला सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या.