



प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच डॉक्टर पायल काटेकर एमडी आयुर्वेदाचार्य पुणे या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून तसेच जागतिक महिला दिनानिमित्त वंदनीय माईसाहेब जगताप. सावित्रीबाई फुले. अहिल्याबाई होळकर. इंदिरा गांधी. राष्ट्रमाता जिजाऊ. यांच्या प्रतिमेचे पूजन केले.. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोळी मॅडम यांनी केला त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हे शाखा यांनी उपस्थित चाकण नगरीच्या महिलांना स्त्रियांची अधिकार कर्तव्य आणि कायदे यांच्या विषयी उत्तम प्रकारचे मार्गदर्शन उपस्थित महिला वर्ग यांना करण्यात आले… त्यानंतर डॉक्टर पायल काटेकर एमडी आयुर्वेदाचार्य यांनी उपस्थित पालकांना स्त्रियांचे आजार.. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता.. विद्यार्थ्यांचा आहार… ध्यान व योग याविषयी उत्कृष्ट असं मनोगत उपस्थित चाकण नगरीच्या महिला पालकांना करण्यात आले.. प्रशालेतर्फे महिला पालकांना 1.संगीत खुर्ची 2.वेशभूषा3. पाककला स्पर्धा 4. मेहंदी स्पर्धा यांचे आयोजन प्रशालेमध्ये करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये बहुसंख्य महिला पालकांनी सहभाग नोंदवला.. प्रत्येक स्पर्धेचे प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले.. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोळी मॅडम व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण करण्यात आले… महिला दिनानिमित्त प्रशालेच्या महिला शिक्षकांनी सौ कोरगावकर मॅडम यांनी आपली कला सादर केली व श्रीमती निमसे मॅडम यांनी महिला दिनानिमित्त महिलांविषयी कविता गायन केले.. त्यानंतर उपस्थित महिला वर्गांचा गमतीदार खेळ घेण्यात आला प्रशालेच्या वतीने सर्व महिला भगिनी शिक्षकांचा प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. सदर कार्यक्रमाचे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे नियोजन सांस्कृतिक व प्रमुख सौ कानवडे मॅडम व सौ कोरगावकर मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला*