

प्रतिनिधी सत्यवान शिंदे
खेड तालुक्यातील आदर्श विद्यालय शिरोली येथे सहजयोग द्वारे स्व चे तंत्रज्ञान जाणून उपक्रम संपन्न. यावेळी दत्तात्रय ढमाले यांनी अगदी साध्या आणि सरळ सोप्या भाषेत विचार मांडले.शरीरातील सूक्ष्म आणि बाह्य जीवन याविषयी मार्गदर्शन केले.जीवनात कसे वागावे आणि कसे वागू नये. जिवनात कुंडली ला किती महत्त्वं आहे. वर्तमानकाळ, भूतकाळ,भविष्यकाळ . प्रमपूज श्री माताजी निर्मला देवी याचे विचार विद्यार्थ्यांन पर्यंत कसे पोहचतील यासाठी खेड तालुक्यातील सहजयोग परिवार अनेक विद्यालयातील पोहचवण्याचे कार्य करत आहे.
परीक्षा जवळ आली आहे तेव्हा अभ्यास कसा करावा आणि मन कसे शांत ठेवावे. यासंदर्भात तोलामोलाचे मार्गदर्शन दत्तात्रय ढमाले पटेल ,ओमकार पटेल यांनी केले. सर्व विद्यार्थीना मोफत मार्गदर्शन मिळत आहे त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. व मुख्याध्यापक .मधुकर दौंडकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते