

प्रतिनिधी दत्ता भगत
पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय द्विशतकीय साहित्य संमेलना मध्ये ॲड. अमोल दौंडकर यांना त्यांचे क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्द कै. रामचंद्र बनकर ई लर्निंग स्कूल गंगानगर ,मिलिटरी बिल्डिंग शेजारी हडपसर ,पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय साहित्य सम्राट समाज गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याने खेड तालुक्यातून नव्हे तर पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी सेल पिंपळगाव दौंडकरवाडी या गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार मिळण्यासाठी मी केलेले कार्य, गुरुजन आणि मित्र परिवार यांनी केलेले मार्गदर्शन हेच माझ्या पुरस्काराचे गमक आहे असे स्पष्ट मत ॲड अमोल दौंडकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी म. भा. चव्हाण, मसुद पटेल, उद्धव महाजन अनेक क्षेत्रातील मान्यवर आणि कवी वर्ग उपस्थित होता.