



प्रतिनिधी संपादक.लहू लांडे
जपानीज एन्सेफलायटीस हा आजार 15 वर्षाखालील बालकांमध्ये आढळून येतो. आशिया खंडात अक्युट एन्सेफलायटीस सिन्ड्रोममुळे हा आजार होतो. या आजारात सुमारे ३० टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात किंवा त्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन न्यूरोलॉजीकल अक्षमता आढळून येते. त्यामुळे सर्व अंगणवाडी केंद्र, खाजगी व शासकीय शाळा अंतर्गत 1 वर्ष ते 15 वर्षाखालील सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
तालुक्यातील या मोहिमे मधे एकुण १,०७,९३७ एवढ्या बालकांना लस देणेचे नियोजन आहे.
१० मार्च पासुन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ विलास माने यांचे मार्गदर्शन नुसार लसीकरण मोहिमेस शुभारंभ झाला आहे .
आज अखेर ६,४७० बालकांना या लसीची मात्रा देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राबविण्यात येत आहे.
तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी ,शिक्षक वृंद आणि आरोग्य कर्मचारी व आशा ,अंगणवाडी सेविका यांनी या मोहिमेत हिरीरिने सहभाग नोंदवला आहे..