


खेड/शिरोली
प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील शिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी इयत्ता पाचवी मधील हर्षवर्धन सोमनाथ सावंत यांने भारत टॅलेंट सर्च एक्झाम 2025 या परीक्षेमध्ये 150 पैकी 138 मार्क(92टक्के) पाडून राज्यात 23 व्या क्रमांकाची मजल मारलीय आहे. त्याने हे जे यश मिळवलेले आहे या यशामागे शाळेचे आदर्श मुख्याध्यापक राजेश कांबळे, मार्गदर्शक शिक्षिका कल्पना पवळे आणि आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे.
तसेच त्याच्या या यशाबद्दल शिरोली गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी , ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्याकडून कौतुक होत आहे. त्याला पुढील परीक्षांसाठी सदिच्छा आणि शुभेच्छांचा वर्षा होत आहे.