
महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन
दिनांक : १८/०३/२०२५
महाळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी महाळुंगे एमआयडीसी हद्दीमध्ये कंपनीतुन कामावरुन सुटलेल्या कामगारांना मारहाण करत लुटणा-या टोळक्यास अटक करुन एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणुन एकुण २.४५,०००/- लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी महाळुंगे औदयोगिक वसाहतीमधील उदयोग व व्यवसायिकांना तसेच विविध कंपन्यामधील कामगारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे या दृष्टीने विविध उपाययोजना आखलेल्या आहेत. त्यानुसार घडलेले गुन्हे तात्काळ उघडकीस आणणे तसेच अनुचित प्रकारांना पायबंध घालण्यासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन कडुन तात्काळ कार्यवाही करण्यात येते.
दिनांक ११/०३/२०२५ रोजी २३/३० वा. चे सुमारास इसम नामे जितेंद्र मोहन वायदंडे, वय ३१ वर्षे, रा. देहु माळवाडी, ता. हवेली जि. पुणे हे कंपनीतुन कामावरुन सुट्टी झाल्यानंतर मोटारसायकल वरुन घरी जात असताना त्यांना महाळुंगे गावचे हद्दीत इंन्डोस्पेस कंपनी परिसरात निर्जण ठिकाणी सहा अनोळखी इसमांनी लाथाबुक्यांनी, चामडी पट्टयांनी तसेच हॉकीस्टिकने मारहाण करुन त्यांचेकडील व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन व स्प्लेंडर मोटार सायकल जबरदस्तीने चोरुन घेवुन गेले म्हणून महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १५७/२०२५ भा.द.वि.क. ३१०(२), ३०९ (६). ३५१ (२). ३(५) गुन्हयामध्ये अज्ञात आरोपी यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाबाबत मा. पोलीस उप आयुक्त सौो, परिमंडळ ३. डॉ. शिवाजी पवार यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपी यांचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी घडलेला असल्याने कोणतीही ठोस माहिती मिळुन येत नव्हती. तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व तपास पथकातील अंमलदार यांनी जलदगतीने घटनास्थळावर आजुबाजुस तसेच तांत्रिक विश्लेषण करत फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांचेकडील मोबाईल व मोटार सायकल जबरीने चोरणा-या आरोपींची ओळख पटली व गुन्हयात सहभागी असलेले आरोपीना नाणेकरवाडी चाकण येथुन अटक केली
अटक आरोपी नामे
१) कृष्णा सुभाष सौराते, वय १९ वर्षे, रा. वाघजईनगर, ता. खेड जि. पुणे
२) भिमराव ज्ञानोबा मुंडे, वय २१ वर्षे, रा. नानेकरवाडी ता. खेड जि. पुणे
३) दिपक विनोद भगत, वय २४ वर्षे, रा. वाघजईनगर, ता. खेड जि. पुणे
४) ऋषिकेश आर्जुन माळी, वय २१ वर्षे, रा. नानेकरवाडी, ता. खेड जि. पुणे
पाहिजे आरोपी
१) प्रदिप बबन जाधव
२) धिरज अंबोरे
सदर गुन्हयातील अटक आरोपी यांनी यापूर्वीही अश्याच प्रकारे काम करुन घरी जात असलेल्या कामगारांचे मोबाईल जबरीने चोरले असल्याचे तसेच चोरी करण्यासाठी महाळुंगे परिसरातुन पल्सर मोटार सायकल्स चोरी केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन गुन्हयातील चोरलेला मोबाईल व मोटार
सायकल तसेच गुन्हयात वापरलेला अॅटो रिक्षा, यापुर्वी चोरी केलेली पल्सर मोटार सायकल असा एकुण २,४५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १००/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८ (१) २) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १४०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२),
३) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १५७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१०(२), ३०९ (६), ३५१(२), ३(५)
४) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १५८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२)
५) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १६०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०४.
६) चाकण पोलीस स्टेशन गु.र.नं. ११७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८ (१), १२७ (१),३(५)
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त श्री शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजेंद्रसिंग गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री नितिन गिते, सहा. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उप निरीक्षक अनिस मुल्ला, सपोफौ राजु जाधव, राजु कोणकेरी, पोहवा अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, पोकौं/शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, मंगेश कदम, राजेंद्र गिरी यांनी केली आहे.
1/2