
पुणे/ खेड
प्रतिनिधी.लहू लांडे
सर्व सैनिक/माजी सैनिक व संबंधितांना याद्वारे कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन, गृहविभाग, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्र. एमआयएस १००६/प्र.क्र.३०९/वि.शा.४. दि.०४/१०/२००७ अन्वये सर्व सैनिक/माजी सैनिक यांच्या कुंटूबियांना संरक्षण देण्याबाबत सर्व जिल्हयांत समिती गठित करण्यात आली आहे.
त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सैनिक/ माजी सैनिक यांच्या कुंटुबियांना संरक्षण देण्याचे अणुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया करीता गठीत केलेल्या समितीची माहीती खालील प्रमाणे
१) मा.श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड अध्यक्ष
२) मा. सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे सदस्य
३) श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, परि-१ (महिला अधिकारी) सदस्य
४) लेप्टनंट कर्नल श्री. सतेश हंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे सदस्य, मो.नं.-८७९८९००५०७
५) श्री. रामदास मदने, माजी सैनिक मुळशी तालुका सदस्य, मो.नं.-८८८८७९५९५९
६) श्री. पोपट सातपुते, माजी सैनिक रा. आळंदी, ता. खेड-सदस्य, मो.नं.-७४४७६६१३९०
७) श्री. दत्ता साबळे, माजी सैनिक, रा. चिखली, ता. हवेली सदस्य, मो.नं.-९९३३०७७७७०
८) श्री. चंद्रकांत शिंदे, माजी सैनिक रा. तळेगाव, ता. मावळ सदस्य, मो.नं.-७०२८४६६६२६
सैनिक/माजी सैनिक यांचे कुंटूबियांकरीता दर महिन्याला समिती सदस्यांची बैठक घेण्यात येवून त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते. तरीही सैनिक/माजी सैनिक यांची काही तक्रार असल्यास, त्यांनी वर नमूद तालुका सदस्य यांच्या मार्फतीने तक्रार सादर करावी.
(संदीप डोईफोडे) पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पिंपरी-चिंचवड