

प्रतिनिधी.लहू लांडे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यात गंभीर स्वरूपाचे अपराध वाढत आहेत. विशेषतः सराईत गुन्हेगारांकडून औद्योगिक व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी व मारामारी यासारखे अपराध घड्डू नयेत, यासाठी मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्र बाळगणा-यां विरूध्द कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
त्याच अनुषंगाने, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रमोद वाघ, व डीबी पथक इंचार्ज सहा. पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, सहा. पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांचे मार्गदर्शनाखाली चाकण पोलिस ठाणे तपास पथकाचे पोलीस अंमलदार भैरोबा यादव व शिवाजी बव्हाण असे अवैद्य शस्त्र बाळगणा-या इसमांची माहिती घेत असताना त्यांना दि. १५/०३/२०२५ रोजी रात्री ३:०० वाजणेच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ रमेश कुटे रा. काळूस रोड भोसे, तालुका खेड, जिल्हा पुणे हा चाकण शहरात एक देशी बनावटीचे पिस्टल आणि काडतूस कमरेच्या पेंटीला लपवून संशयास्पदरीत्या फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर चाकण पोलिस ठाणेचे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. अशोक गांगड, पोलीस अंमलदार भैरोबा यादव, शिवाजी चव्हाण, विवेक सानप व नवनाथ मापारे असे मौजे चाकण गावातील मेदनकरवाडी फाटा जवळ सापळा लावून पहाटे ०४:०५ वाजणेच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ रमेश कुटेला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या पॅटीच्या कमरेत ४०,०००/-रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत काडतूस सापडले. त्याच्यावर यापूर्वी दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासणी दरम्यान उघड झाले. ते गुन्हे खालील प्रमाणेः-
१) चाकण पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर ४३९/२०२२ भादवि क.३४१, ३२३, ५०४, ५०६,१४३,१४९ २) चाकण पोलीस ठाणे ६५०/२०२४ भादवि कलम ३०७ आणि आर्म ऍक्ट कलम ३/२५
येणे प्रमाणे आरोपीवर २ शरिराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे गुन्हे अभिलेखावरून दिसून आले. त्यामुळे चाकण पोलिस विभागाच्या तपास पथकाने आरोपीला त्याच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध अवैध शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
चाकण पोलीस विभाग नागरीकांच्या सुरक्षा आणि शांतीसाठी सदैव तत्पर आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच समाजाच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग कायम काम करत राहील.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ श्री. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, डी बी पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि/गणपत धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक अशोक गांगड, पोलीस अंमलदार भैरोबा यादव, शिवाजी चव्हाण, विवेक सानप, नवनाथ मापारे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.
(डॉ. शिवाजी पवार) पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, पिंपरी चिंचवड