


प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील शिरोली येथील पोखरण वस्ती या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त बाळशिराम महाराज मिंडे यांचे सुश्राव्य असे किर्तन संपन्न झाले. संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा भक्ती पर अभंग घेतला. देव आणि भक्त यांचे नाते सांगणारा अभंगाचे चिंतन केले. भक्ती कशी करावी भक्तीचे महत्त्व आणि भक्तीमुळे माणसाला जीवनामध्ये काय काय फायदे होतात. अनेक विविध दृष्टांत देऊन सर्व भाविक भक्तांचे मने जिंकले तसेच त्यांनी जगावे कसे आणि मरावे कसे या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले. भगवंताची सेवानि स्वार्थपणे जर केली तर आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. देव कधी कोणाचे वाईट करीत नाही. देव कधी कोणाचे चांगले करीत नाही. शेवटी आपण जे कर्म करतो . प्रामाणिकपणे कर्म केले त्याच्यावर विश्वास ठेवला तर चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरण हीच खरी भक्ती आहे नामच तुम्हाला तारू शकते. आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर पूजा करावी, दान धर्म करावा ,पवित्र अशी तुळशीची माळ घालावी , लेक वाचवा आणि लेक शिकवा, मुलांना मोबाईलचा वापर करून देऊ मुलांच्या हातात मोटरसायकल देऊ नये.अशा प्रकारचा तोला मोलाचा संदेश त्यांनी दिला. गायक, वादक टाळकरी ,विणेकरी यांची मोलाची साथ त्यांना लाभली या कीर्तन रुपी सेवेची सौजन्य निखिल पारगे उद्योजक , अमोल उमाप जाखमाता लँड डेव्हलपर्स यांनी दिले हरी जागर यमाई भजनी मंडळ कोहिनकरवाडी यांचा झाला व सर्वात शेवटी महाप्रसादाने समारोप करण्यात आला. यावेळी शिरोली गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ,ग्रामस्थ पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.