


प्रतिनिधी सत्यवान शिंदे
खेड तालुक्यांतील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे बाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले आहे. या शिबिरात शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत दिव्यांग नोंद रजिस्टर करणे. जिल्हा परिषद निर्वाह अनियमितता दूर करणे. दिव्यांग गांधी घरपट्टी 50% सवलत देण्यात यावी.यशवंतराव घरकुल योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करणे व त्याचा लाभ मिळवून देणे. तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी असलेले अनिमित्त दूर करणे. खेड पंचायत समितीच्या शेष निधीतून नेहमी अन्याय झालेल्या दिवंग्यांना 40 ते 59% बांधवांना निर्माण भत्ता चालू करणे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामसेवकांची त्या गावात असलेल्या दिवंगाची यादी दर्शनी बाजूला लावणे.पंचायत समितीचे आपल्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांचे एक दिव्यांग नोंदणीकृत संस्थेचे प्रतिनिधी बोलावून अडीअडचणी समजून घेणे व त्यावर मार्गदर्शन करणे अशा विविध विषयांवरती चर्चासत्र संपन्न झाली. यावेळी पंचायत समितीचे गटविकासधिकारी विशाल शिंदे, समाज कल्याण अधिकारी जाधव साहेब, संजय वाघमारे तसेच चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र मिरजे, आपुलकी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पगडे आणि जवळपास 70 ते 80 दिवंग बांधव यावेळी उपस्थित होते. सर्व अधिकारी वर्गाने अगदी उत्कृष्ट असे योजनेविषयी मार्गदर्शन केले . सर्व दिव्यांग बांधवांना अनेक योजनेची माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले आहे