
सायबर पोलीस ठाणे येथे दाखल असणा-या गुन्हयातील फिर्यादी यांना यातील आरोपी यांनी इन्शुरन्स कंपन्यामधुन बोलत असल्याचे सांगुन पॉलिसी काढण्यासाठी, त्यानंतर त्यांची मोठी पॉलिसी जमा होणार आहे, त्यासाठी त्यांना जीएसटी, इनकम टॅक्स, टिडीएस, ट्राझेक्शन चार्जेस, व्हेरीफिकेशन चार्जेस, एन ओ सी चार्जेस असे भरावे लागतील आणि ती सर्व रक्कम फिर्यादी यांना थोडच्या दिवसानंतर परत करण्याचे अमिष दाखवुन त्यांच्याकडुन पैसे घेतले आहे. त्यानंतर फिर्यादी यांना एनपीसीआय, आयआरडीए, दिल्ली फायनान्स मिनीस्ट्री मधुन बोलत असुन त्यांचे पेंडींग पैसे काढुन देतो इत्यादी कारणे सांगुन त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांना वेळोवेळी वेगवेगळ्या बैंक अकाऊंटमध्ये, व रोख स्वरुपात एकूण २,३०,०८,८९८/- रुपये भरण्यास भाग पाडुन आर्थिक फसवणुक केली म्हणून फिर्यादी यांनी कायदेशीर तक्रार दिल्याने सायबर पोलीस स्टेशन गु.र.नं ०४/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील १,६१,४०,०००/- रु रोख रक्कम ही फिर्यादी यांनी पुणे परीसरात लक्ष्मणकुमार पुनारामजी प्रजापती याच्याकडे दिली असल्याचे सांगीतले. त्या अनुषंगाने लक्ष्मणकुमार पुनारामजी प्रजापती यांचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेतला असता तो रविवार पेठ पुणे येथे असल्याची माहीती मिळाली होती. त्यावरुन मा. वरिष्ठांची परवानगी घेऊन सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, प्रकाश कातकाडे व स्टाफ यांना रवाना करण्यात आले होते. त्यांनी शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे १० लाख रुपये रोख व ०१ पैसे मोजण्याची मशीन व इतर कागदपत्रे मिळून आली. त्यावरुन त्याचा दाखल गुन्हयात सहभाग निष्पन्न होत असल्याने त्यास दिनांक २२/०१/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती.
त्यानंतर दाखल गुन्हयात इतरही आरोपी असल्याची व दिल्ली येथिल असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. परंतु आरोपी लक्ष्मणकुमार प्रजापती यास अटक केल्यानंतर पाहीजे आरोपीचे फोन बंद झाले होते. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपीचा शोध घेतला असता त्यांचे लोकेशन दिल्ली येथिल असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व पोलीस उपनिरीक्षक विदया पाटील यांचे दोन पथक वरीष्ठांची परवानगी घेऊन दिल्ली येथे रवाना केले. १५ दिवस सलग दिल्ली येथे आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी यांनी व्हिक्टीम यांचे मोबाईल नंबर व अकाऊंट नंबर वापरल्याचे दिसुन आले. फरीदाबाद येथील एका व्हिक्टीम सोबत ते अजुनही संपर्कात होते. त्या व्हिक्टीमसी पोउपनि कातकाडे यांची टिम संपर्कात राहुन व त्यांचे नावे दिलेले अकाऊंट अॅक्टीव करण्यासाठी आरोपी यास येण्यास भाग पाडले व त्यांनी भुपेंदंर जिवनसिंग जिना व लक्ष्मण सिंग सन ऑफ हरेंदर सिंग यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच
त्यांच्याकडे मिळुल आलेल्या मोबाईल मध्ये त्यांनी एन.पी.सी.आय अधिकारी असल्याची सांगुन फिर्यादी यांना पाठविलेले आय. कार्ड सुध्दा दिसुन आले आहे. तसेच सदर आरोपी यांनी भारतातील वेगवेगळ्या व्यक्तींची फसवणुक केली असल्याचे दिसुन येत असुन त्याबाबत तपास रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे मा. डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि सागर पोमण, पोउपनिरी वैभव पाटील, पोउनिरी प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक विदया पाटील पोलीस अंमलदार दिपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, सौरम घाटे, श्रिकांत कबुले, विशाल निचीत, दिपाली चव्हाण, प्रिया वसावे, भाविका प्रधान सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
(संदिप डोईफोडे) पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, परी चिंचवड,