
राजगुरूनगर
प्रतिनिधी . लहुजी लांडे
येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 14 रिक्षा चालक महिलांचा सन्मान खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीपआण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रवचनकार ह.भ.प. मनिषा वळसे पाटील,
अस्क वृद्धाश्रमाचे संस्थापक दादासाहेब गायकवाड, शिक्षक सहकारी
पतसंस्थेच्या माजी सभापती तृष्णा घुमटकर, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वैभव नाईकरे, देव्हरकर हॉलिडेजच्या प्रोप्रा निकिता देव्हरकर, कविता देव्हरकर उपस्थित होते.
कार्यक्रम स्थळी कॅन्सरग्रस्त युवती पौर्णिमा खंडारे हिला उपचारासाठी मित्रसेन डोंगरे यांजकडून पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. निराधार वयस्कर आजीला दोन हजार रुपयांचा किराणा शशिकांत सांडभोर यांच्याकडून भेट देण्यात आला. समाजेवक
दादासाहेब गायकवाड यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानला रुग्ण सेवेसाठी एक व्हील चेअर भेट दिली
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील महिला रिक्षाचालक जुबेदा माडजे,
रेणुका काकडे,
संगीता जाधव,
पिंकी जाधव,
मनीषा तोडकर,
स्नेहल सातव,
सविता आव्हाड,
निर्मला पाचांगणे,
शिला दिंडे,
भाग्यश्री भोगले,
शोभा शिंदे,
स्वप्नाली नाईकडे,
जयश्री अब्राहम, आणि
कामिनी पवार
यांना फेटा, शाल, सन्मान चिन्ह आणि रिक्षा सि. एन.जी गॅस खर्च म्हणून प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले.
जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठानला मित्रसेन डोंगरे, गणेश देव्हरकर, संजय घुमटकर, ऍड.शुभम गाडगे, हौशीराम कोहिनकर, गणेश थिगळे,अशोक घुमटकर, संदीप दिवटे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
यावेळी व्याख्यात्या स्वप्ना भुजबळ, प्रवचनकार
मनिषा वळसे,
कवी डी.के. वडगावकर रिक्षाचालक महिला शिला दिंडे,सविता आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे सूत्रसंचालन अनुजा कोहिनकर यांनी केले तर आभार कैलास मुसळे यांनी मानले.