


प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील शिरोली येथील पोखरण वस्तीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सात दिवसांमध्ये अनेक नामांकित महाराजांचे कीर्तन संपन्न झाले. शेवटी या अखंड हरिनाम सप्ताह सांगता ह भ प वैष्णवी दिदी सरस्वती यांच्या सुश्राव्य किर्तन झाले. संत तुकाराम महाराजांचा काल्याच्या कीर्तनाचा अभंग त्यांनी घेतला .कुणाच्या मागे जावे. कुणाकडून काय काय मिळवावे . कुणाची संगत करावी.गुरु अज्ञान दूर करतात आणि सद्गुरु अज्ञान घालवतात. संतांच्या आणि देवाच्या मागे जर गेले तर जीवनाचे सार्थक होईल. भगवंताच्या अगोदर जर संतांच्या मागे गेले तर संत देव दाखवल्याशिवाय राहणार नाही . दुर्जनांच्या संगतीत गेले तर वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. हरिनामाचा काला खाण्याचा प्रसाद घेण्या बरोबर अध्यात्मिक विचारांचा प्रसाद घ्यावा.अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. जगात सर्व काही बदलेल पण हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि गाथा कधीही बदलणार नाही. श्रीकृष्णाच्या विविध रूपे आणि त्यांच्या गुणांचे वर्णन त्यांनी केले. लेक वाचवा, लेक शिकवा. लहान मुलांना मोबाईल आणि मोटरसायकल पासून दूर ठेवा. आई-वडिलांची सेवा करा. असा तोला मोलाचा संदेश त्यांनी दिला. यावेळी त्यांना पखवाज वादक,टाळकरी, गायक आणि विणेकरी यांची मोलाची साथ लाभली. खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबाजीशेठ रामचंद्र काळे यांचा भव्य नागरी सत्कार शिरोली येथील पोखरण वस्तीमधील ग्रामस्थांनी केला. आमदार बाबाजी काळे यांनी सदिच्छा शुभेच्छा देताना विविध विकासाची कामे करणार अशा प्रकारचे आश्वासन दिले. कीर्तनाचे सौजन्य शांताराम लक्ष्मण सावंत( ओमकार इलेक्ट्रिक्स )हरिभाऊ विठोबा सावंत (प्रगतशील शेतकरी) आणि हिरामण नारायण सावंत (हॉटेल गुरुकृपा) यांनी दिले. शिरोली गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.शेवटी अखंड हरिनाम सप्ताहाचे समारोप उत्साही वातावरणात करण्यात आला.
खेड/शिरोली
प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील शिरोली येथील पोखरण वस्तीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सात दिवसांमध्ये अनेक नामांकित महाराजांचे कीर्तन संपन्न झाले. शेवटी या अखंड हरिनाम सप्ताह सांगता ह भ प वैष्णवी दिदी सरस्वती यांच्या सुश्राव्य किर्तन झाले. संत तुकाराम महाराजांचा काल्याच्या कीर्तनाचा अभंग त्यांनी घेतला .कुणाच्या मागे जावे. कुणाकडून काय काय मिळवावे . कुणाची संगत करावी.गुरु अज्ञान दूर करतात आणि सद्गुरु अज्ञान घालवतात. संतांच्या आणि देवाच्या मागे जर गेले तर जीवनाचे सार्थक होईल. भगवंताच्या अगोदर जर संतांच्या मागे गेले तर संत देव दाखवल्याशिवाय राहणार नाही . दुर्जनांच्या संगतीत गेले तर वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. हरिनामाचा काला खाण्याचा प्रसाद घेण्या बरोबर अध्यात्मिक विचारांचा प्रसाद घ्यावा.अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. जगात सर्व काही बदलेल पण हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि गाथा कधीही बदलणार नाही. श्रीकृष्णाच्या विविध रूपे आणि त्यांच्या गुणांचे वर्णन त्यांनी केले. लेक वाचवा, लेक शिकवा. लहान मुलांना मोबाईल आणि मोटरसायकल पासून दूर ठेवा. आई-वडिलांची सेवा करा. असा तोला मोलाचा संदेश त्यांनी दिला. यावेळी त्यांना पखवाज वादक,टाळकरी, गायक आणि विणेकरी यांची मोलाची साथ लाभली. खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबाजीशेठ रामचंद्र काळे यांचा भव्य नागरी सत्कार शिरोली येथील पोखरण वस्तीमधील ग्रामस्थांनी केला. आमदार बाबाजी काळे यांनी सदिच्छा शुभेच्छा देताना विविध विकासाची कामे करणार अशा प्रकारचे आश्वासन दिले. कीर्तनाचे सौजन्य शांताराम लक्ष्मण सावंत( ओमकार इलेक्ट्रिक्स )हरिभाऊ विठोबा सावंत (प्रगतशील शेतकरी) आणि हिरामण नारायण सावंत (हॉटेल गुरुकृपा) यांनी दिले. शिरोली गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.शेवटी अखंड हरिनाम सप्ताहाचे समारोप उत्साही वातावरणात करण्यात आला