


प्रतिनिधी. रोहित पाटील
सदर कार्यक्रमाला 320 पेक्षा जास्त आशा कार्यकर्ते व 17 आशा गटप्रवर्तक उपस्थित होत्या सदर कार्यक्रमात सन 2023 24 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या तालुकास्तरावरील प्रथम क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्र करंजविहिरे येथील आशा गटप्रवर्तक प्रतिभा संदेश झाडे यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा प्रथम क्रमांक सविता अर्जुन घुले, द्वितीय क्रमांक सुरेखा गोरक्षनाथ मेदनकर, तृतीय क्रमांक ऋतुजा राजेश टिंगरे व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रथम पुरस्कार वर्षा नितीन नानेकर यांना देण्यात आला.
तसेच तालुक्यातील सर्व आशा गटप्रवर्तक यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात स्वादिष्ट जेवण देण्यात आले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने यांच्या नेतृत्वाखाली
तालुका समुह संघटक श्री निलेश बेलवटे पंचायत समिती खेड आरोग्य विभाग यांचे कार्यक्षमतेने सदर कार्यक्रम पार पडला. खेड तालुक्यातील 11 प्रा आ केंद्र व 60 उपकेंद्र यांतुन या कार्यक्रमाला 320 पेक्षा जास्त आशाताई नी कार्यक्रमाला हजेरी लावली. वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे तालुका कार्यालय पं. स. खेड येथुन श्रीम. आशा नवगिरे, आशा नाईकडे, रेवननाथ ढाकणे, सानिका घाटकर, उपस्थित होते. आरोग्य सेवक श्री. नितिन भुसारी, श्री. प्रतिक गवारी तसेच श्री केतन घोलप, श्रीमती वैष्णवी पवार यांनी विशेष परिश्रम केले. सर्व आशा कार्यकर्ती यांनी आपले दैनंदिन सेवा देतानाचे अनुभव आणि बळकटीकरण व्यक्त केले तसेच त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यात आला. व स्वादिष्ट जेवण देण्यात आले.गटप्रवर्तक यांनी मान्यवरांचे आभार मानुन सदर कार्यक्रम संपन्न झाला.