

प्रतिनिधी दत्ता भगत
तुळापूर – स्वराज्यरक्षक धर्मवीर श्रीमंत संभाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथी पुण्यस्मरण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वढू-तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.
या वेळी महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या शौर्याला वंदन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराजांच्या त्याग आणि पराक्रमाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराजांचे बलिदान हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या निमित्ताने वढू-तुळापूर येथे विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.