

प्रतिनिधी सत्यवान शिंदे
खेड तालुक्यातील रेटवडी येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी उत्सव सोहळा सोमवार दिनांक 31 /3 /2025 रोजी होणार आहे .यावेळी सकाळी सात ते नऊ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महापूजा, सायंकाळी पाच ते सात वाजता हरिनाम भजनाचा कार्यक्रम ,सायंकाळी सात वाजता महाआरती ,महाप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे अशी माहिती स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष विकास काळे, खजिनदार निलेश शेलार, महेंद्र थिटे, आदर्श निवेदक शरद काका वाबळे यांनी दिली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज जयंती निमित्त रेटवडी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक , स्वामी भक्तांनी महाआरती व महा प्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री स्वामी समर्थ मठाधिपती सद्गुरु विजय महाराज आणि स्वामी समर्थ मठ अध्यक्ष व सर्व संचालक यांनी कळविले आहे.