


खेड तालुक्यातील रेटवडी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सकाळी सात ते नऊ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महापूजा झाली. सायंकाळी पाच ते सात वाजता हरिनाम भजनाचा कार्यक्रमझाला. ,सायंकाळी सात वाजता महाआरती झाली. त्यानंतर,महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी रेटवडी, खरपुडी, निमगाव आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. अध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष विकास काळे, खजिनदार निलेश शेलार, महेंद्र थिटे आणि सर्व स्वामी भक्तांनी यांनी अगदी व्यवस्थित नियोजन केले आहे. श्री स्वामी समर्थ मठाधिपती सद्गुरु विजयमहाराज यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना शुभाशीर्वाद दिले. या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचा मान सन्मान आणि नियोजन प्रसिद्ध निवेदक शरद काका वाबळे पा. यांनी केले.